राज्यपाल : अभिभाषणाने हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ

प्रतिनिधी। गाेवन वार्ता
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर २०३७ पर्यंत विकसित गोवा करण्यासाठीचा आराखडा अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. २०३७ पर्यंत विकसित गोवासाठीची सर्व उद्दिष्टे पूर्ण होतील, असा विश्वास राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी अभिभाषणात व्यक्त केला.
पाच दिवसीय हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ सोमवारी राज्यपालांच्या अभिभाषणाने झाला. मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, वीज, सार्वजनिक बांधकाम, कृषी, जलपुरवठा, कला, समाज कल्याण, मच्छीमारी या क्षेत्रांतील कामगिरीचा आढावा राज्यपालांनी अभिभाषणात मांडला.
अभिभाषणात मांडलेले विशेष मुद्दे
- ‘कुशावती’ जिल्ह्यामुळे मूलभूत सुविधा तयार होऊन प्रशासन लोकांच्या दारात पोहोचेल.
- गोव्याचा नकाशा प्रथमच कोकणीतून तयार झाला आहे. गोव्याचा वारसा, संस्कृती आणि कोकणीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.
- ‘माझे घर’ योजनेमुळे ‘हॅप्पीनेस इंडेक्स’मध्ये वाढ होईल.
- कोमुनिदाद जमिनीतील घरे नियमित करण्यासाठी कोमुनिदाद कायद्यात दुरुस्ती केली.
- ‘रूका’ कायद्याखाली पंचायत क्षेत्रातील ६०० चौ.मी. आणि पालिका क्षेत्रातील १ हजार चौ.मी.पर्यंतची बांधकामे होणार नियमित.
- इफ्फीसाठीच्या मूलभूत सुविधांमुळे गोव्याची सर्जनशील राजधानी म्हणून ओळख
- आकडेवारीनुसार, २०२३-२४ वर्षी गोव्याचा विकास दर १४.९४ टक्के
- सरकारी सेवा कार्यक्षम करण्यासाठी कर्मचारी भरती आयोगामार्फत गुणवान कर्मचाऱ्यांची भरती
- तक्रारी, समस्या मांडण्यासाठी नवा अँड्रोईड आणि आयओएस आधारित अॅप
- ग्राम समृद्धी योजनेखाली नोव्हेंबरपर्यंत १०.६५ कोटींची २६ कामे पूर्ण.
- गोव्यातील साक्षरतेचे प्रमाण ९९.७२ टक्के. राष्ट्रीय प्रमाण ९५ टक्के
- ३,०४८ शेतकऱ्यांना २३९.४८ लाखांची आधारभूत रक्कम अदा.
- मुख्यमंत्री सुधारित कामधेनू योजनेखाली २७ शेतकऱ्यांना ६६.५८ लाखांचे अनुदान
- १२ खनिज ब्लॉकांचा लिलाव. ५ ब्लॉक सुरू. २५२.८३ कोटींचा महसूल प्राप्त.
- रस्ते, इमारतींचे १,४१०.८७ कोटींचे ५९ प्रकल्प पूर्ण. १,००२ कोटींचे १५ प्रकल्प सुरू
- तिलारीचे पाणी बंद असताना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ३५० कोटी
- फेब्रुवारीपासून पणजी-बेती मार्गावर मोठ्या फेरीबोटी
- प्रशासन स्तंभ, वास्को बसस्थानक, जुंता हाऊस फेरबांधकामासाठी १,७२१ कोटी
- १,३४१ कोटी रुपये खर्चून भूमिगत वीज वाहिन्यांचे काम सुरू
- सीझेडएमपी २०११ ला मंजुरी.
- डीडीएसएसवायचा ८,६७१ जणांना लाभ, ३३ कोटी खर्च
- मेडिक्लेम योजनेचा २७८ जणांना लाभ, २.५८ कोटी खर्च
- दयानंद सामाजिक योजनेचे १,२३,०४६ लाभार्थी
- पर्यटकांच्या प्रमाणात ५.३५ टक्क्यांनी वाढ
- रस्ता अपघात नुकसानभरपाई योजनेखाली ५९ जणांना १.१८ कोटींची भरपाई