करमलघाट, काणकोण येथे अपघातात तिघे जखमी : दोन विदेशींचा समावेश

रस्त्यावरील वर्दळ वाढली

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
करमलघाट, काणकोण येथे अपघातात तिघे जखमी : दोन विदेशींचा समावेश

पणजी : करमलघाट, काणकोण (Canacona) येथे दोन कारची धडक बसून झालेल्या अपघातात (Accident) तिघेजण जखमी झाले. त्यात दोघे विदेशी नागरिक तर एका कार चालकाचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही बाळ्ळी (Balli) येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) दाखल करण्यात आले. 

अपघातानंतर काही वेळा वाहतुकीची कोंडी झाली. काणकोण पोलिसांनी (Police)  क्रेन आणून वाहने बाजूला करून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून दिला. अपघात नेमका कसा घडला; त्याचा शोध पोलीस घेत आहेत. 

रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढली 

दरम्यान, मडगाव कारवार राष्ट्रीय हमरस्त्यावर वाहनांची वर्दळ खूप वाढली आहे. गोवा ते कर्नाटकात जाणारी वाहने व मोठ्या प्रमाणात पर्यटक या रस्त्याने जात असतात. काणकोणमध्ये पाळोळे, आगोंद, गालजीबाग यासारखे अनके समुद्रकिनारे असून, याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. हे पर्यटक ‘रेंट अ कार’, ‘रेंट अ बाईक’ घेऊन फिरत असतात. काही वेळा नशेत भरधाव वाहने हाकली जात असून, त्यामुळे या रस्त्यावर छोटेमोठे अपघात सुरूच असतात; अशी माहिती या रस्त्यावरून नियमित प्रवास करीत असलेल्यांनी दिली.

करमलघाटात काही ठिकाणी रस्ता अरुंद

मडगाव काणकोण राष्ट्रीय महामार्ग करमलघाट व अन्य काही ठिकाणी खूपच अरुंद असून, त्यामुळेही अपघात घडत आहेत. या रस्त्यावरून सुरू असलेल्या वाहनांच्या वर्दळीच्या तुलनेत काही ठिकाणी रस्ता खूपच अरुंद आहे. त्यामुळे अपघात वाढत असल्याची माहिती नियमित प्रवास करीत असलेल्या काही वाहनचालकांनी दिली. 

दरम्यान, मडगाव काणकोण राष्ट्रीय हमरस्त्याचे अपूर्ण असलेले काम पूर्ण झाल्यावर येथील वाहतूक समस्या सुटणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्यातील सूत्रांनी दिली. 

हेही वाचा