धेंपो महाविद्यालयाच्या राजश्री पेडणेकर हिचा पॉवरलिफ्टिंगमध्ये इतिहास : रचला नवा रेकॉर्ड

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
धेंपो महाविद्यालयाच्या राजश्री पेडणेकर हिचा पॉवरलिफ्टिंगमध्ये इतिहास : रचला नवा रेकॉर्ड

पणजी :  श्रीनिवासा सिनाई धेंपो महाविद्यालयातील (Srinivassa Sinai Dempo College) एमकॉम अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी (Student)  राजश्री पेडणेकर हिने २०२५-२६च्या इंटर कॉलेज (Inter college)  पॉवरलिफ्टिंग (Powerlifting) चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला. 

तिने केवळ ५७ किलो गटात सुवर्ण पदक मिळविण्याबरोबरच स्क्वॉट्स, बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट या तीन लिफ्ट्समध्ये एकूण ३०७ किलो वजन उचलून नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला. गोवा विद्यापीठाने  आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयातील या स्पर्धेत तिने ही कामगिरी केली. आठ वेगवेगळ्या वजन गटांतील गोव्याच्या विविध कॉलेजांमधील ९८ सहभागी महिलांमध्ये तिला ‘गोवा विद्यापीठाची सर्वांत बलशाली महिला’ हा 'किताब घोषित करण्यात आले. 

धेंपो महाविद्यालयाचे अध्यक्ष श्रीनिवास व पल्लवी धेम्पे, राजेश भाटीकर,  प्रो. (डॉ.) मनोज कामत  यांनी राजाश्री पेडणेकर यांचे अभिनंदन करून तिच्या शैक्षणिक आणि खेळातील कारकीर्दीसाठी कॉलेजकडून पूर्ण सहकार्य आणि मदत देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती प्राचार्य डॉ. मनोज कामत यांनी दिली. 

हेही वाचा