मागणी मांडण्यासाठी भंडारी समाजाचे आंदोलन; पणजीत आझाद मैदानावर धरणे

पणजीः भंडारी समाज (Bhandari Samaj) समितीची निवडणूक (Election) घेण्याच्या आदेशाची फाईल (File) पडून आहे ती फाईल लवकरातलवकर मंजूर करावी. सरकार (Government) केवळ भंडारी समाजाचा वापर करून समाजामध्ये फूट घालते. आमच्या सहनशीलतेचा अंत न पाहता सरकारने निवडणूक विषयीचा निर्णय घ्यावा; अशी मागणी भंडारी समाजाचे नेते संजीन नाईक यांनी केली आहे.
उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानुसार समाजाची नवी निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी भंडारी समाजाच्या एका गटाने आझाद मैदानावर धरणे धरली. यावेळी संजीव नाईक, उपेंद्र गावकर आणि इतर नेते उपस्थित होते.
भंडारी समितीचे आणि तालुका पातळवरील नेत्यांना बोलावून सरकारला एक संदेश देण्यासाठी आम्ही हे आंदोलन केल्याचे नाईक म्हणाले. एक वर्ष जास्त होऊन गेले कायदा खाते आमची फाईल घेऊन झोपले आहे. राज्य निबंधक ही फाईल उशीखाली घेवन झोपले आहेत आणि निबंधकाला गोव्याचे सरकार साथ देत आहे. आमच्याशी खेळू नका. आम्ही बंडखोर भंडारी, आम्ही खूप सहनशीलता दाखवली आहे; लवकर ही फाईल हलवून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे; अशी मागणी नाईक यांनी केली.
८ ऑक्टोबरला आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले होते. आमच्याबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक होते. पण आमची फसवणूक झाली. लगेच फाईल मंजूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पण ही फाईल अजूनपर्यंत आली नाही. सरकारला भंडारी समाजाचे पडलेले नाही. जेव्हा निवडणूक येते तेव्हा त्यांना समाजाची आठवण येते. आमच्या नेत्यांना वापरतात आणि जेव्हा न्याय मागण्याची वेळ येते तेव्हा सरकार फूट घालण्याचे राजकारण करते, असा आरोप नाईक यांनी केला.
भाजप सरकार दोन नेत्यांमध्ये फूट घालू शकते. पण आमच्या समाजामध्ये फूट घालणे शक्य नाही. आम्ही रवी नाईक यांचा आदर्श घेऊन पुढे जातो तसेच आमच्याबरोबर रवी आणि देव रुद्रेश्वर आहे. आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला एक संदेश दिल्यानंतर आमची पुढील कृती ठरणार. या पुढे आंदोलन झाले तर एससी, एसटी, ओबीसी आनी अल्पसंख्यांक यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे, असे नाईक यांनी सांगितले.