पोटनिवडणूक उमेदवारीबाबत पक्षच निर्णय घेईल !

रितेश रवी नाईक यांचे मत


3 hours ago
पोटनिवडणूक उमेदवारीबाबत पक्षच निर्णय घेईल !

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत अद्याप अधिसूचना जारी झालेली नाही. पोटनिवडणुकीत कुणाला तिकीट द्यायचे हे पक्ष ठरवेल. आम्ही पक्ष घेईल त्या निर्णयाला पाठिंबा देऊ, असे मत रितेश रवी नाईक यांनी व्यक्त केले. शुक्रवारी पणजीत झालेल्या चित्रकला प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी पोटनिवडणूक, राजीव गांधी कला मंदिर व अन्य विषयांवर संवाद साधला.
नाईक म्हणाले की, फोंडा मतदारसंघात विविध लोकोपयोगी प्रकल्प सुरू आहेत. मतदारसंघात लवकरच मल्टी स्पोर्ट्स पार्क येणार आहे. त्याची पायाभरणी झाली आहे. येथे बॅडमिंटन, बास्केटबॉल कोर्ट, वॉकिंग ट्रॅक उभारले जातील. तेथेच आम्ही अॅम्फीथिएटर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे कला, चित्रप्रदर्शन, संगीत कार्यक्रम करणे शक्य होणार आहे. अॅम्फीथिएटरचा येथील कलाकारांना फायदा होईल.
अॅम्फीथिएटरसाठी ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तेथे आम्ही विविध कलांचे सादरीकरण करणारे कार्यक्रम आयोजित करणार आहोत. राजीव गांधी कला मंदिरचा ताबा नुकताच घेतला आहे. लवकरच प्रशासकीय मंडळाची बैठक घेण्यात येईल. यामध्ये भविष्यात कोणते कार्यक्रम आयोजित करायचे याबाबत निर्णय होईल. तेथे लोकांना चांगल्या दर्जाचे कार्यक्रम पाहायला मिळतील.
_ रितेश नाईक, अध्यक्ष, राजीव कला मंदिर