शाहिदचा अॅक्शन अवतार ते ‘कोहरा’चे गुढ

या आठवड्यात मनोरंजनाचा धमाका

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
12th February, 07:40 pm
शाहिदचा अॅक्शन अवतार ते ‘कोहरा’चे गुढ

मनोरंजन विशेष : या आठवड्यात प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने मेजवानी असणार आहे. थिएटर्ससोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही विविध जॉनरचे सिनेमे आणि वेब सीरिज रिलीज होत आहेत. तुमचा वीकेंड अधिक मनोरंजक करण्यासाठी खालील यादी नक्की वाचा.

१. कोहरा : सीझन २ (नेटफ्लिक्स)

पोलीस तपासावर आधारित या गाजलेल्या सीरिजमध्ये बरुण सोबती आणि मोना सिंग मुख्य भूमिकेत आहेत. कौटुंबिक गुपिते आणि क्राईमचा थरार यात पाहायला मिळेल.

२. ओ रोमियो (चित्रपटगृह)

विशाल भारद्वाज दिग्दर्शित या अ‍ॅक्शन थ्रिलरमध्ये शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा १३ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.

३. द कन्ज्युरिंग : लास्ट राईट्स (जिओ हॉटस्टार)

हॉरर फ्रँचायझीमधील हा नववा चित्रपट आहे. एड आणि लॉरेन वॉरेन यांची ही १९८६ मधील सत्य घटनेवर आधारित केस अंगावर काटा आणणारी आहे.

४. लव्ह इज ब्लाईंड : सीझन १० (नेटफ्लिक्स)

निक आणि वॅनेसा लॅची होस्ट करत असलेल्या या रिअ‍ॅलिटी शोमध्ये एकमेकांना न बघता केवळ संवादाच्या माध्यमातून जोडीदार निवडला जातो.

५. क्रॉस : सीझन २ (नेटफ्लिक्स)

हा एक वेगवान अ‍ॅक्शन थ्रिलर आहे. डीसी डिटेक्टिव्ह अ‍ॅलेक्स क्रॉस एका महिला व्हिजिलान्टेचा शोध घेत असताना वैयक्तिक संकटात सापडतो.

६. बेबी गर्ल (सोनी लिव्ह)

हा एक मल्याळम क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. हॉस्पिटलमधून तीन दिवसांचे बाळ अचानक गायब होते आणि संशयाची सुई निविन पॉलीवर येते.

७. थलैवर थंबी थलैमाईल (नेटफ्लिक्स)

नितीश सहदेव दिग्दर्शित तामिळ कॉमेडी-ड्रामा. गावात एकाच वेळी आलेल्या लग्न आणि अंत्यसंस्कारामुळे उडालेली विनोदी तारांबळ यात दिसते.

८. द म्युझियम ऑफ इनोसन्स (नेटफ्लिक्स)

नोबेल विजेते लेखक ओरहान पामुक यांच्या कादंबरीवर आधारित ही सीरिज ७० च्या दशकातील इस्तंबूलमधील उत्कट प्रेमकथा मांडते.

९. तू या मैं (चित्रपटगृह)

शनाया कपूर आणि आदर्श गौरव यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट तरुण पिढीची मानसिकता आणि संघर्षाची कथा मांडतो.

१०. अमर विश्वास (अमेझॉन एमएक्स प्लेयर)

राजीव खंडेलवाल अभिनीत हा कोर्टरूम ड्रामा एका जिद्दी वकिलाची आणि त्याने न्यायासाठी दिलेल्या लढ्याची कथा सांगतो.

११. बँडवाले (प्राईम व्हिडीओ)

मैत्री, महत्त्वाकांक्षा आणि संगीत यावर आधारित ही म्युझिकल ड्रामेडी सीरिज १३ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

१२. सैयारा : री-रिलिज (चित्रपटगृह)

व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने अहान पांडे आणि अनित पड्डा यांचा हा रोमँटिक ड्रामा पुन्हा एकदा १३ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

#EntertainmentWeekly #OTT #MovieRelease #ShahidKapoor #Kohrra2 #TheConjuring
हेही वाचा