कर्मचारी भरती आयोगाचे पाऊल : १३ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पणजी महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी कर्मचारी भरती आयोगाने बंंपर भरतीची जाहिरात दिली आहे. पोलीस शिपाईच्या ५०० हून अधिक पदांसह एकूण ७२२ पदांसाठी कर्मचारी भरती आयोगाने अर्ज मागवले आहेत. इच्छुकांनी १३ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच घेतले जातील. अर्ज सादर करण्यासाठीचे पोर्टल २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होईल, असे आयोगाने कळवले आहे.
पदांंविषयी कोणत्याही प्रकाराचा पत्रव्यवहार आयोग स्वीकारणार नाही. अर्ज https://gssc.goa.gov.in या पोर्टलवर सादर करावे लागतील. शैक्षणिक पात्रता तसेच अन्य अटींसह पूर्ण जाहिरात २० फेब्रुवारीपर्यंत जारी केली जाणार आहे. आयोगाने सध्या तात्पुरती जाहिरात दिली आहे. सर्वाधिक म्हणजे ७२२ पदांसाठीची या वर्षाची ही पहिलीच जाहिरात आहे. यापूर्वी प्राथमिक शाळांतील शिक्षक पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी झाली होती. मात्र त्या जाहिरातीत पदे कमी होती.
जाहिरातीतील पदे आणि त्यांची संख्या
१. रेंंज फॉरेस्ट ऑफिसर : १३ पदे (सर्वसामान्य ५, एसटी २, ओबीसी ४, ईडब्ल्यूएस २)
२. प्लाटून कमांंडर (पुरुष) : ४ पदे (यूआर ३, ओबीसी १)
३. राऊंंड फॉरेस्टर : २३ पदे (यूआर ११, एसटी २, ओबीसी ८, ईडब्ल्यूएस २)
४. पोलीस शिपाई : ३६० (पुरुष/स्त्री) पदे
पोलीस शिपायांंच्या ३६० पदांंपैकी पुरुषांसाठी ३०२, तर महिलांसाठी ५८ पदे आहेत.
पुरुषांच्या ३०२ पदांपैकी यूआर १५२, एसटी ३५, एससी ५, ओबीसी ८१, ईडब्ल्यूएससाठी २९ पदे राखीव आहेत. ३०२ पैकी एक्स सर्व्हिसमनसाठी १६, गुणवान खेळाडूंसाठी १४, माजी अग्नीवीर/सुरक्षारक्षक/ मनुष्यबळ विकास महामंंडळाचे कर्मचारी यांच्यासाठी ३७ पदे आहेत.
महिलांसाठीच्या ५८ पदांपैकी यूआर ३०, एसटी ६, एससी २, ओबीसी १५, ईडब्ल्यूएससाठी २९ पदे राखीव आहेत. ५८ पदांपैकी गुणवान खेळाडूंसाठी ४, माजी अग्नीवीर/सुरक्षारक्षक/ मनुष्यबळ विकास महामंंडळाचे कर्मचारी यांच्यासाठी ६ पदे राखीव आहेत.
५. पोलीस शिपाई (सशस्त्र दल) : ११९ पदे (यूआर ७२, एसटी १५, एससी १, ओबीसी २१, ईडब्ल्यूएस १०). ११९ पदांपैकी एक्स सर्व्हिसमन १ आणि गुणवान खेळाडूंसाठी २ पदे राखीव आहेत.
६. पोलीस शिपाई (ड्रायव्हर ग्रेड ३) : १११ पदे (यूआर ५७, एसटी १३, एससी २, ओबीसी २९, ईडब्ल्यूएस १०). १११ पदांपैकी एक्स सर्व्हिसमन २ आणि गुणवान खेळाडूंसाठी ५ पदे राखीव आहेत.
७. शिपाई (ग्रीजर) : १ पद (यूआर १)
८. शिपाई (इलेक्ट्रिशियन) : १ पद (यूआर १)
९. फॉरेस्ट गार्ड : ९ पदे (यूआर ४, एसटी १, ओबीसी ३, ईडब्ल्यूएस १)
१०. साहाय्यक सुपरिटेंडेंट (पुरुष) : ४ पदे (एसटी १, ओबीसी ३)
११. वॉर्डन (पुरुष) : ६० पदेे (यूआर २८, एसटी ६, एससी २, ओबीसी २१, ईडब्ल्यूएस ३). ६० पदांपैकी एक्स सर्व्हिसमन २ आणि गुणवान खेळाडूसाठी १ पद आरक्षित आहे.
१२. मॅट्रन (महिला) : १० पदे (यूआर ५, एसटी १, ओबीसी ३, ईडब्ल्यूएस १)
१३. लास्कर (पुरुष) : ५ पदे (यूआर १, एसटी १, ओबीसी २, ईडब्ल्यूएस १)
१४. एस्कॉर्ट (महिला) : २ पदे (यूआर १, एसटी १).
अपात्र उमेदवारांना इशारा
अपात्र असलेल्या उमेदवारांंनी या पदांंसाठी अर्ज करू नयेत. अपात्र उमेदवारांनी अर्ज केल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कर्मचारी भरती आयोगाने दिला आहे.