लॅबोरेटरी असिस्टंटसह इतर पदांसाठी २८ व १ मार्च रोजी होणार सीबीटी परीक्षा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
17th February, 04:34 pm
लॅबोरेटरी असिस्टंटसह इतर पदांसाठी २८ व १ मार्च रोजी होणार सीबीटी परीक्षा

पणजी : गोवा राज्य कर्मचारी भरती आयोगातर्फे (Goa State Staff Recruitment Commission) लॅबोरेटरी असिस्टंट, ज्युनियर र‌िसर्च असिस्टंट व इतर पदांसाठी पहिली सीबीटी परीक्षा (CBT Exam) २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणार आहे.

आयोगाने परीक्षेचे स्थळ तसेच परीक्षेचे (Exam) वेळापत्रक जाहीर केले आहे. दिव्यांग उमेदवारांना २५ मिनीटांचा अधिक वेळ दिला जाईल. लॅबोरेटरी असिस्टंट, फिशरीज सर्वेयर, ज्युनियर जीओलॉजिस्ट या पदांसाठी आयोगाने ५ डिसेंबर २०२५ रोजी जाहीरात दिली होती. या प्रमाणे आता पहिली सीबीटी परीक्षा होणार आहे.

लॅबोरेटरी टेक्निशियन, लॅबोरेटरी असिस्टंट, ज्युनियर रिसर्च असिस्टंट व फिशरीज सर्वेयर पदांसाठी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी परीक्षा होईल. ६० गुणांच्या पेपरसाठी ७५ मिनिटांचा कालावधी असेल. दिवसभर विविध तुकड्यांमध्ये उमेदवारांची विभागणी करण्यात आली आहे.

उत्तर गोव्यात आग्नेल इनिस्टट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, आसगाव येथे परीक्षा होईल. दक्षिण गोव्यात डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजीनीअरींग, फातोर्डा, रोझरी कॉलेज, नावली व नॅशनल इनिस्टट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, कुंकळ्ळी येथे परीक्षा होणार आहे. असिस्टंट सुपरीडेंट ऑफ फिशरीज, इन्स्पेक्टर लीगल मेट्रोलॉजी, ज्युनियर जीओलॉजिस्ट, असिस्टंट केमिस्ट, असिस्टंट आर्चिविस्ट, इन्वेस्टिगेटर पदांसाठी १ मार्च २०२६ रोजी परीक्षा होईल.

उत्तर गोव्यात आग्नेल इनिस्टट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, आसगाव व सेंट झेवियर महाविद्यालय, धुळेर येथे परीक्षा होईल. दक्षिण गोव्यात डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजीनीअरींग, फातोर्डा, रोझरी कॉलेज, नावेली व नॅशनल इनिस्टट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, कुंकळ्ळी येथे परीक्षा होणार आहे.