लाल किल्ला परिसरातील धार्म‌िक स्थळे लश्कर- ए- तोयबाच्या निशाण्यावर

दिल्लीत ‘हाय अलर्ट’ जारी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
21st February, 05:30 pm
लाल किल्ला परिसरातील धार्म‌िक स्थळे लश्कर- ए- तोयबाच्या निशाण्यावर

नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi) गर्दीच्या परिसरातील धार्म‌िक स्थळे (Religious Places) व वारसा स्थळे यांच्यावर पाक‌िस्तानातील लश्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेकडून (Terrorist Organisation) हल्ला होण्याची शक्यता, गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यानुसार राजधानी दिल्लीत ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. चांदणी चौक, लाल किल्ला परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

गुप्तचर संस्थांतील सूत्रांच्या माहितीनुसार; चांदनी चौक परिसरातील एक मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असण्याची शक्यता आहे. लाल किल्ल्याजवळील संवेदनशील क्षेत्र व इतर गर्दीच्या ठिकाणी ‘आयईडी’द्वारे स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याचा संशय आहे. ६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील एका मशिदीत झालेल्या स्फोटाचा बदला घेण्यासाठी लश्कर ए तोयबा हा कट रचत असल्याचे गुप्तचर संस्थेतील सूत्रांचे म्हणणे आहे.

खबरदारी म्हणून जुन्या दिल्लीतील धार्म‌िक स्थळे व सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सर्व परिसरावर कॅमे माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. वाहने तपासली जात आहेत. अत‌िरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. बॉम्बची शोध घेणारी व निकामी करणारे पथके, श्वान पथके व जलद प्रतिसाद पथके तयार ठेवण्यात आली आहेत. 

लाल किल्ल्याच्या परिसरात तीन महिन्यांपूर्वी झाला होता स्फोट

गेल्या वर्षी १० ऑक्टोबर रोजी लाल किल्ल्याजवळ कार बॉंबस्फोट झाला होता. या स्फोटात १२ जण ठार झाले होते तर २० हून अधिक जखमी झाले होते. त्यानंतर देशभरात छापेमारी करून उच्चशिक्षिक दहशतवादी व त्यांच्या हस्तकांना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा दिल्लीत स्फोटाची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने खळबळ माजली आहे. 

हेही वाचा