पुलामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला मिळणार नवी दिशा

मुख्यमंत्री : सावर्डे-सत्तरीतील नवीन पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन


21st February, 11:57 pm
पुलामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला मिळणार नवी दिशा

पुलाच्या पायाभरणी समारंभात कोनशिलेचे अनावरण करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार डॉ. देविया राणे व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई : सत्तरी तालुक्यातील दळणवळण आणि विकासाला नवी गती देण्यासाठी सज्ज असलेल्या सावर्डे येथील नवीन पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शनिवारी पार पडले. ५० वर्षांपूर्वीच्या जुन्या पुलाच्या जागी आता आधुनिक आणि भव्य पुलाची उभारणी होणार आहे. या पुलामुळे अंतरच कमी होणार नाही, तर ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. सावर्डे येथील नवीन पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
सावर्डे येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार डॉ. देवीया राणे व इतर उपस्थित होते. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, मुख्यमंत्री आणि माझ्यात मतभेद नाहीत. आम्ही एकसंधपणे गोव्याचा विकासरथ पुढे नेऊ. आगामी निवडणुकीत भाजप २७ पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेत येईल. आमदार डॉ. देविया राणे यांनी हा पूल सत्तरीवासीयांच्या २५ वर्षांच्या स्वप्नांची पूर्तता असल्याचे सांगितले.

हेही वाचा