
मुंबई : महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) होळी, मोहर्रम आणि गांधी जयंती या दिवशी राज्यात ‘ड्राय डे’ कायम राहील, अशी स्पष्ट घोषणा केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र अबकारी खात्याने (Excise department) अधिकृत स्पष्टीकरण जारी केले आहे.
काही वृत्तांमध्ये राज्य सरकारने या दिवशी परवानाधारक मद्यविक्री दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याचा दावा करण्यात आला होता. ‘ड्राय डे’च्या दिवशी बेकायदेशीर आणि बनावट मद्यविक्री वाढू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचेही त्या माहितीत नमूद करण्यात आले होते.
मात्र, अबकारी विभागाने हे वृत्त फेटाळून लावत, संबंधित दिवशी मद्यविक्रीवरील निर्बंध पूर्ववतच राहतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे होळी, मोहर्रम आणि गांधी जयंती या दिवशी राज्यभरातील मद्यविक्री दुकाने बंदच राहणार आहेत.
दरम्यान, या संदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आल्याचे सांगण्यात आले.