अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून गरोदर केल्याप्रकरणी आरोपनिश्चितीचा आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून गरोदर केल्याप्रकरणी आरोपनिश्चितीचा आदेश

पणजी : लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पिडीत मुलीने दिलेल्या जबाबानुसार तिचे संशयिताशी लैंगिक संबंध होते. त्यातून ती गरोदर झाली. याची दखल घेऊन प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयित २० वर्षीय युवकाविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला. याबाबतचा आदेश पणजी येथील पाॅक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश पूजा कवळेकर यांनी दिला.
या प्रकरणी मडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानुसार, या प्रकरणी महाराष्ट्र राज्यात पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सदर गुन्हा मडगाव पोलिसांना वर्ग करण्यात आला. त्यानुसार, पी​डित मुलगी आणि संशयितामध्ये मैत्री होती. याच दरम्यान १५ मार्च आणि ३ एप्रिल रोजी संशयित युवकाने तिच्या परवानगी शिवाय जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर जुलै २०२५ मध्ये तिला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिला महाराष्ट्रातील इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे ती चार महिन्याची गरोदर असल्याचे समोर आले. त्यानंतर तिथे गर्भपात करण्यात आले. त्यानुसार, तिथे गुन्हा दाखल करून मडगाव पोलीस स्थानकात गुन्हा हस्तांतरण करण्यात आला. याची दखल घेऊन मडगाव पोलिसांनी ५ आॅगस्ट रोजी संशयित युवकाला अटक केली. त्यानंतर २५ आॅगस्ट रोजी पणजी येथील पाॅक्सो न्यायालयाने संशयिताला सशर्त जामीन मंजूर केला. दरम्यान मडगाव पोलिसांनी तपासपूर्ण करून ९ ऑक्टोबर रोजी पाॅक्सो न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची तसेच पी​डित मुलीने दिलेल्या जबाबाची दखल घेतली. त्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून संशयित युवकाविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला.                   

हेही वाचा