युद्धाचा भडका; जागतिक खत पुरवठ्याला फटका : शेतीवर होणार परिणाम

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
युद्धाचा भडका; जागतिक खत पुरवठ्याला फटका : शेतीवर होणार परिणाम

नवी दिल्ली : अमेरिका-इस्त्रायल-इराण (America-Israel-Iran) युद्धामुळे (War) अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. भारतासहीत जागतिक बाजारावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाले असताना आता एक नवे संकट दिसू लागले आहे. त्यामुळे अन्न तुटवडा होण्याचा धोका वाढला आहे. युद्धामुळे आखाती देशांमधून होणारा खत पुरवठा ठप्प झाल्याने; जागतिक बाजारात खतांच्या (Fertilizer) किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यात आहेत. कृषी उत्पादनाला याचा मोठा फटका बसणार असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

ओमान, कतार, सौदी अरेबिया, युएई हे युरिया खत पुरवठा करणारे प्रमुख देश आहेत. अमोनिया, सल्फर, युरिया यांचा सर्वाधिक पुरवठा या देशांमधून केला जातो. हे सर्वच देश सध्या युद्धाच्या झळा सोसत आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा खतांचा पुरवठा ठप्प झाला आहे. ४० टक्के खतांची वाहतूक या मार्गातून होते. कच्चा तेलाची वाहतूक बंद होण्यापेक्षा खत पुरवठा ठप्प होणे जगाला जास्त हानीकारक आहे. कारण त्याचा थेट परिणाम अन्न पुरवठ्याच्या साखळीवर होणार आहे. 

भारताकडे खरीप हंगामासाठी मुबलक साठा 

भारताकडे पुढील खरीप हंगामासाठी देशात खतांचा मुबलक साठा असल्याचा केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. सध्य स्थितीत देशात १७७.३१ लाख टन एवढा खतांचा साठा असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. अरब देशांशिवाय खत पुरवठा करणारे इतर मोठे देश नाहीत. रशिया हा एकमेव मोठा पुरवठादार असला तरी आखाती देशांमधून होत असलेल्या पुरवठ्याची रशिया बरोबरी करू शकत नाही. चीनने निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे चीनलाही तूट भरून काढणे शक्य होणार नसल्याचे सध्या दिसत आहे. 

भारत खतांच्या आयातीवर विसंबून

भारत मोठ्या प्रमाणावर खतांच्या आयातीवर विसंबून आहे. भारतात दह महिन्याला २० लाख टन एवढी खतांची आयात होते. केंद्र सरकारने गेल्या आर्थ‌िक वर्षात खत अनुदानावर १.९ लाख कोटी रुपये खर्च केले होते. 

हेही वाचा