युद्धाचा भडका; अबू धाबीतील सर्वात मोठ्या मंदिराला अलर्ट! मंदिर राहणार बंद

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
09th March, 06:29 pm
युद्धाचा भडका; अबू धाबीतील सर्वात मोठ्या मंदिराला अलर्ट! मंदिर राहणार बंद

अबू धाबी : संयुक्त अरब अमिरातीची (UAE) राजधानी अबू धाबी (Abu Dhabi) येथील श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिर (बीएपीएस) (BAPS) परिसरात अलर्ट असून, सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या युद्ध स्थितीमुळे मंदिर तात्पुरते बंद करण्यात आले आहे. सोमवारपासून पुढील सूचना येईपर्यंत भाविक, पर्यटकांसाठी (Tourist) मंदिर (Temple) बंद राहील असे मंदिर प्रशासनाने जाहीर केले आहे.

सुरक्षेच्या कारणावरून मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार असले तरी; दैनंदिन पूजा अर्चा सुरू राहणार आहे. मंदिरात राहणारे संत, स्वामी नियमितपणे पू्जा आणि प्रार्थना करत राहणार आहेत. मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, ते देश आणि जगातील सर्व लोकांच्या शांती, सुरक्षितता आणि कल्याणासाठी प्रार्थना करतील.

मंदिराने जनतेला शांत राहण्याचे, कोणत्याही अफवा टाळण्याचे व शक्य तितके घरात राहण्याचे आवाहन केले आहे. सरकारी यंत्रणांनी जारी केलेल्या अधिकृत सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यापुढे मंदिर भाविकांसाठी कधी खुले केले जाणार याची माहिती देण्यात येणार आहे. 

हेही वाचा