उत्पल पर्रीकर पॅनलला ३ जागा

पणजी : संपूर्ण गोव्याचे (Goa) लक्ष लागलेल्या पणजी (Panjim) महानगरपालिकेच्या (Muncipal Corporation) निवडणुकीत (Election) भाजप (BJP) समर्थित मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलने ३० पैकी २७ जागांवर विजय मिळवला. बाबूश यांनी पणजीमधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. उत्पल पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील ‘आमी पणजेकार पॅनल’ला ३ जागांवर समाधान मानावे लागले.
‘आमी पणजेकार पॅनल’कडून महापौर पदाचे दावेदार असणाऱ्या सुरेंद्र फुर्तादो यांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रभाग क्रमांक ६ मध्ये ‘आमी पणजेकार पॅनल’च्या शीतल नाईक पराभूत झाल्या. या पॅनलचे प्रभाग क्रमांक ७ मधील उमेदवार लियोनिड फुर्तादो, प्रभाग क्रमांक १७ मधील उमेदवार जॅक सुखीजा, प्रभाग क्रमांक २९ मधील उमेदवार लिबर्टा मेंडीस यांना यश आले. शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर मतमोजणी सुरू झाली. सुरूवातीच्या टप्प्यातच बाबूश पॅनल विजयी होण्याचे संकेत मिळत होते. दुपारी १२.३० नंतर बाबूश पॅनल मधील बहुतेक उमेदवार विजयी घोषित करण्यात आले.
याआधी ११ मार्च रोजी महापालिकेसाठी मतदान झाले होते. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी किंचीत कमी झाली होती. यंदा महापालिका निवडणुकीत ६९.०७ टक्के मतदान झाले होते. यावेळच्या निवडणुकीत ‘आमी पणजेकार पॅनल’ने कॅसिनो मुळे पणजीत झालेल्या समस्यांवर भर दिला होता. तर बाबूश पॅनलतर्फे मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या आधारावर निवडणूक लढवली होती.
तीन प्रभागांसाठी फेरमतमोजणी
मत मोजणी वेळी तीन प्रभागात फेरमतमोजणी करण्यात आली. फेरमतमोजणी नंतर प्रभाग १७ मध्ये जॅक सुखीजा, प्रभाग २९ मध्ये लिबर्टा मेंडीस आणि प्रभाग १० मध्ये प्रसाद आमोणकर यांना विजयी घोषित करण्यात आले.
भरघोस जनादेशाबद्दल जनतेचे आभार : मुख्यमंत्री डॉ. सावंत
महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील पॅनेलला भरघोस जनादेश दिल्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो. पणजीच्या विकासाबाबत असणाऱ्या आमच्या वचनबद्धतेवर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. सुशासन, प्रगती आणि जन सेवेद्वारे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
डबल इंजिन सरकारवर जनतेचा विश्वास : दामू नाईक
भाजपच्या डबल इंजिन सरकारच्या विकासकामांवर जिल्हा पंचायत तसेच आता महापालिका निवडणुकीत जनतेने विश्वास दाखवला आहे. विरोधक एकत्र आले तरी पणजीकरांनी भाजपला कौल दिला. फोंडा पोट निवडणुक आणि विधानसभा निवडणुकीत देखील आम्हाला यश मिळेल.
मतदारांना गृहीत धरायचे नसते : बाबूश
मला या पॅनेलचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी भाजपचा आभारी आहे. विरोधी पक्ष एकत्र येऊन देखील भाजपला हरवू शकले नाहीत. कुणीही मतदारांना गृहीत धरायचे नसते अशी प्रतिक्रिया मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली.
तुकाराम यांना सर्वाधिक मते
सर्वाधिक मते : प्रभाग ११ तुकाराम चिनन्नावर ७१३
सर्वात कमी मते : प्रभाग २४ शिवदास रायकर १२
सर्वाधिक मतांनी विजयी : प्रभाग ११ तुकाराम चिनन्नावर (४५७)
सर्वात कमी मतांनी विजयी : प्रभाग १७ जॅक सुखीजा (२)
प्रभाग १
युतिका जांबावलीकर : ३९६
रोशन मार्टिन्स : १०२
दामिनी कुंकळळीकर : २४९
प्रभाग २
कॅरोलिना पो : ५५९
उमा वळवईकर : २०५
प्रभाग ३
मार्गारिटा फर्नांडिस : ३३२
जेन पो : २८३
प्रभाग ४
रोहित मोन्सेरात : ४०२
जॉन पो : १५८
आग्नेलो सिल्वेरा : १०४
प्रभाग ५
किशोर शास्त्री : ४७२
सुदिन कामत : ४११
प्रभाग ६
बेंटो सिल्वेस्टर : ५००
डॉ.शीतल नाईक : ४०२
प्रभाग ७
लियोनिड फुर्तादो : ४३४
संजीव देसाई : ३६६
प्रभाग ८
करीना शिरोडकर : ५७०
शुभदा शिरगावकर : ३८५
प्रभाग ९
कबीर मखिजा : ५१९
सुरेंद्र फुर्तादो : ४०४
प्रभाग १०
प्रसाद आमोणकर : ३४५
विष्णू नाईक : ३२४
प्रभाग ११
तुकाराम चिनन्नावर : ७१३
गौरव नाईक : २५६
प्रभाग १२
वर्षा शेट्ये : ४७८
शबनम खान : १८२
ब्रिजेश कवळेकर : २२५
प्रभाग १३
उदय मडकईकर : ५६३
निळकंठ चारी : ३६८
प्रभाग १४
प्रजोत वायंगणकर : ५२५
मदन फातर्पेकर : २६०
प्रभाग १५
शायनी चोपडेकर : ४९३
सूरज नाईक : २१२
प्रभाग १६
अस्मिता केरकर २८७
प्रांजल नाईक २५७
प्रभाग १७
जॅक सुखीजा ३४४
एडवर्ड जॉर्ज ३४२
प्रभाग १८
कृष्णा शिरोडकर : ४४३
आशिष नागवेकर : २१२
प्रभाग १९
निकीता नाईक : ३४९
डियोडीटा परेरा : २८३
प्रभाग २०
शुभम चोडणकर : ३३८
महेश रेवणकर : २४१
गोविंद चोडणकर : ४५
प्रभाग २१
मनिषा मणेरकर : ३७४
भालचंद्र पेडणेकर : २८८
प्रभाग २२
दीक्षा माईणकर : ४०४
नेहा कवळेकर : २७५
प्रभाग २३
विद्या गडकर : ४२९
ज्योती मसुरकर : २४८
प्रभाग २४
करण पारेख : ३४३
नितीन नार्वेकर : २५७
शिवदास रायकर : १२
प्रभाग २५
किर्ती साखळकर : ३६१
माधवी आमोणकर : ३२०
प्रभाग २६
वसंत आगशीकर : ३७७
शुभदा धोंड : १७६
राजेश केळुसकर : १५
नम्रता सरदेसाई : ६६
संजय सरमळकर : १३
प्रभाग २७
विठ्ठल चोपडेकर : ३२०
वासुदेव मणेरकर : २२२
प्रभाग २८
रुपेश हळर्णकर : ४२९
घनश्याम नास्नोडकर : ३२३
प्रभाग २९
लिबर्टा मेंडीस : ३२४
सॅन्ड्रा डी कुन्हा : २९३
प्रभाग ३०
सिल्वेस्टर फर्नांडिस : ४२७
वैभव साळगावकर : ३२८