३०० प्रकरणे प्रलंबित

पणजीः गोवा राज्य माहिती आयोगाने (Goa State Information Commission) ९०० पेक्षा जास्त प्रकरणे निकालात काढली तर ३०० प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे निकालात काढण्यासाठी आयोग सरासरी दोन ते तीन सुनावण्या घेतो, अशी लेखी माहिती मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
विधानसभेच्या (Assembly) पटलावर कुडतरीचे आमदार आलेक्स रेजीनाल्ड लॉरेन्स यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री तथा माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लेखी उत्तरात वरील माहिती दिली. माहिती हक्क कायद्याच्या तरतुदीनुसार एक ते तीन सुनावण्या घेऊन प्रकरणे निकालात काढली जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. प्रतिज्ञापत्र, लेखी युक्तीवाद सादर करण्याच्या आधारावर प्रकरणे निकालात काढण्याचा काळ केस टू केस तत्त्वावर ठरतो.
सुनावणीसाठी व्हिडीयो कॉन्फरन्सींग सुविधा उपलब्ध आहे. भारत व्हीसी एपच्याद्वारे सुनावणीला व्हर्चुएल पद्धतीने हजर राहण्यासाठी याचिकादार आणि प्रतिवादी यांना आयडी दिली जाते.
मागील अडीच वर्षांत आयोगाच्या पुढे ९१९ प्रकरणे नोंद झाली आणि या काळात ९४२ प्रकरणे निकालात काढण्यात आली. तर २५ फेब्रुवारी, २०२६ पर्यंत ३०६ प्रकरणे प्रलंबित आहेत.
वर्ष नवी प्रकरणे निकालात काढलेली प्रकरणे
२०२४ ३४९ २०९
२०२५ ४९८ ६३८
२०२६ ७२ ९५
(फेब्रुवारी पर्यंत)