विद्यालयांमध्ये ‘१०९८’ हेल्पलाईन नंबर लावणे बंधनकारक

शिक्षण खात्याचा आदेश

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
17th March, 06:13 pm
विद्यालयांमध्ये ‘१०९८’ हेल्पलाईन नंबर लावणे बंधनकारक

पणजी : गोव्यातील (Goa)  सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांसाठी नोटीस बोर्ड तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी ‘१०९८’ हेल्पलाईन (1098 Helpline) नंबर लावणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांवरील (Students) मारहाण तसेच लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार गोवा शिक्षण खात्याने (Goa Education Department)  यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार सरकारी, अनुदानित तसेच विनाअनुदानित सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना सहज दिसेल अशा ठिकाणी हा हेल्पलाईन नंबर लावणे आवश्यक राहणार आहे.

विद्यार्थ्यांवरील अत्याचार, छळ किंवा मारहाण यांसारख्या घटनांची त्वरित नोंद घेण्यासाठी आणि पीडितांना मदत मिळवून देण्यासाठी ‘१०९८’  ही बालसुरक्षा हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court of India)  यांनीही ‘पोस्को’ कायद्यांतर्गत (POCSO) अशा उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले होते.या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला अधिक बळकटी मिळणार असून; शाळांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.





हेही वाचा