मला भाजपची उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज : विश्वनाथ दळवी

मुख्यमंत्री तोडगा काढणार

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
20th March, 03:44 pm
मला भाजपची उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज : विश्वनाथ दळवी

फोंडा :  फोंडा (Ponda) मतदारसंघात (Constituency) गेल्या काही वर्षांपासून भाजप पक्षाचे काम पुढे नेत आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत (By-election) उमेदवारी मिळण्याची आशा होती. पण पक्षश्रेष्ठींनी रितेश नाईक यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी कार्यकर्ते घरासमोर एकत्रित आले. यासंबंधी मुख्यमंत्री (Chief Minister)  डॉ. प्रमोद सावंत राज्यात परतल्यानंतर चर्चा करून तोडगा निघण्याची शक्यता असल्याची माहिती नगरसेवक विश्वनाथ दळवी यांनी दिली. 

गुरुवारी संध्याकाळी नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी विश्वनाथ दळवी यांच्या घरासमोर एकत्रित येऊन त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. या संबंधी अधिक माहिती देताना विश्वनाथ दळवी यांनी रितेश नाईक यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आपल्याला शॉक बसला. तसेच कार्यकर्ते सुद्धा नाराज झाले असल्याचे सांगितले.

नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्यात परतल्यानंतर चर्चा करून आवश्यक तोडगा काढण्यात येईल. पक्षाचा निर्णय मान्य करावा लागतो. पक्षाने घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्ते नाराज झाले तरी पक्षाचा निर्णय मान्य करावा लागणार असल्याचे विश्वनाथ दळवी यांनी सांगितले.

हेही वाचा