आगोंद समुद्रकिनाऱ्यावरील बेकायदेशीर बांधकामे पाडण्यास सुरूवात

६८ पैकी ३३ बांधकामे पाडणार

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
25th March, 05:27 pm
आगोंद समुद्रकिनाऱ्यावरील बेकायदेशीर बांधकामे पाडण्यास सुरूवात

पैंगीण :  किनारी नियमन विभागातर्फे (CRZ) जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) दिलेल्या आदेशावरून बुधवारी दक्षिण गोवा बांधकाम हटाव पथकाने (South Goa Demolition Squad)  काणकोण तालुक्यातील (Canacona Taluka) आगोंद पंचायत (Agonda Panchayat)  क्षेत्रातील वाल येथील बेकायदेशीर बांधकामे पाडण्यास सुरूवात केली आहे. एकूण ६८ बेकायदेशीर बांधकामांपैकी ३३ बांधकामे पाडण्यात येणार आहेत. 

बांधकामे पाडताना गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरण क्षेत्रीय अधिकारी रौनत देसाई, पंचायत संचालनालयाचे अमोल नाईक गावकर, राजेश टी. गावकर, मामलेदार गजेश शिरोडकर, संयुक्त मामलेदार गायत्री देसाई, पोलीस निरीक्षक प्रवीण गावस, मडगाव, काणकोण पोलीस स्थानकातील कुमक होती. 

आल्कामिस्ट या कंपनीतर्फे किनारी नियमन विभागाला वाल येथील समुद्रकिनाऱ्यानजीकच्या  बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यासंदर्भात तक्रार दिली होती.  ६८ बांधकामांपैकी काहीनी आपली आस्थापने स्वत:हून हटविली तर काहीनी स्थगिती आणून बांधकामांचे रक्षण केले.