इराणचा नौदल प्रमुख ठार; इस्त्रायलचा दावा

होर्मुझ तणाव वाढला : इंधन वाहतुकीवर परिणामाची भीती

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
26th March, 06:06 pm
इराणचा नौदल प्रमुख ठार; इस्त्रायलचा दावा

तेहरान/बंदर अब्बास : मध्यपूर्वेतील (Middle East) तणाव अधिक तीव्र होत असताना, इस्रायली (Israel) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इराणच्या (Iran) इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC)  नौदल प्रमुख अलीरेझा तंगसीरी यांचा बंदर अब्बास येथे झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

सदर अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तंगसीरी हे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्यामागील प्रमुख व्यक्ती होते. त्यांच्या नेतृत्वाखालीच या महत्त्वाच्या समुद्री मार्गावर दबाव निर्माण करण्यात आला होता, असेही सांगण्यात आले.

इराणकूडन अजून पुष्टी नाही 

दरम्यान, या हल्ल्याबाबत इराणकडून किंवा इस्रायली लष्कराकडून अधिकृत पुष्टी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे या घटनेबाबत संभ्रम कायम आहे. तेल वाहतुकीच्या दृष्टीने होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची आहे. सध्या हा मार्ग बंद असल्याने; जागतिक तेल वाहतुकीला त्याचा जबर फटका बसला आहे. 

हेही वाचा