मध्यपूर्वेत तणाव शिगेला; इराणकडून १० लाख सैनिकांची तयारी

अमेरिकेच्या संभाव्य भू-आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर तयारी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
27th March, 05:28 pm
मध्यपूर्वेत तणाव शिगेला; इराणकडून १० लाख सैनिकांची तयारी

तेहरान : मध्यपूर्वेत (Middle East) वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने (Iran) मोठा लष्करी दावा करत ज‌मिनीवरील युद्धासाठी तब्बल १० लाखांहून अधिक सैनिक तयार ठेवले असल्याचे सांगितले आहे. इराणी माध्यमांच्या अहवालानुसार, अमेरिकेकडून (USA)  संभाव्य भू-आक्रमणाची शक्यता लक्षात घेऊन ही तयारी करण्यात येत आहे.

या परिस्थितीत इराणमधील तरुणांमध्ये सैन्यात भरती होण्यासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. बसीज, रिव्होल्यूशनरी गार्ड आणि नियमित सैन्यात सामील होण्यासाठी अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, अमेरिकाही मध्यपूर्वेत आपली लष्करी उपस्थिती वाढवण्याच्या तयारीत आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या अहवालानुसार, अमेरिकेचा संरक्षण विभाग सुमारे १०,००० अतिरिक्त सैनिक पाठवण्याचा विचार करत आहे. या फौजेत पायदळ सैनिकांसोबतच बख्तरबंद वाहनांचाही समावेश असू शकतो.

हे अतिरिक्त सैनिक आधीच तैनात असलेल्या सुमारे ५,००० मरीन आणि २,००० पॅराट्रूपर्ससोबत कार्यरत राहतील. हे पॅराट्रूपर्स ८२व्या एअरबोर्न डिव्हिजनमधील असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकूणच, इराण-अमेरिका तणाव अधिक तीव्र होत असल्याचे संकेत मिळत असून, या घडामोडींमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा