कामुर्ली येथे कुत्र्याला ठार मारून नदीत फेकले; एकाविरुद्ध गुन्हा

प्राणी क्रूरता प्रतिबंधक कलमांन्वये नोंदवला गुन्हा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th March, 06:58 pm
कामुर्ली येथे कुत्र्याला ठार मारून नदीत फेकले; एकाविरुद्ध गुन्हा

म्हापसा : गोव्यातील (Goa) कामुर्ली येथे भटक्या कुत्र्याला (Stray Dog)  दंडुक्याने ठार मारून नदीत फेकल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांकडून संशयित दिलीप खोर्जुवेकर (६४) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. डीएसपीसीएच्या (DSPCA) अपुर्वा नाईक यांच्या तक्रारीवरून कोलवाळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, संशयिताने भटक्या कुत्र्याला दंडुक्याने मारले. त्यानंतर त्याला दोरीने बांधले व कामुर्ली जेटी परिसरात नदीत ठेवून दिले. त्यातच कुत्रा मृत पावला. 

याप्रकरणी डीएसपीसीएच्या अपुर्वा नाईक यांनी कोलवाळ पोलिसांत तक्रार केली व नंतर कोलवाळ पोलीस निरीक्षकांशी चर्चा केली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ३२५ व प्राणी क्रूरता प्रतिबंधक कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास कोलवाळ पोलीस करीत आहेत.

हेही वाचा