८ वर्षांपुर्वीच्या वास्कोतील ६.५९ कोटींच्या फसवणूक प्रकरणी एकाला अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
31st March, 05:25 pm
८ वर्षांपुर्वीच्या वास्कोतील ६.५९ कोटींच्या फसवणूक प्रकरणी एकाला अटक

वास्को : ८ वर्षांपूर्वीच्या सहारा इंडिया कंपनीच्या वास्को येथील कार्यालयाशी संबंधित सुमारे ६ कोटी ६९ लाख ६६ हजार ७७ रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित रघुवीर शर्मा याला आर्थ‌िक गुन्हे शाखेने अटक केली. 

वरीलप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर संशयित अटक (arrested)  चुकवण्यासाठी विविध ठिकाणी लपूप राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आर्थ‌िक गुन्हे शाखेने (Economic Offence cell)  गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा माग काढत अखेर त्याला अटक केली.

संशयिताला न्यायालयात हजर केले जाणार असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आर्थ‌िक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रझाशाद शेख याच्या नेतृत्त्वाखालील पथकाने कारवाई करीत संशयिताला अटक केली. 

वरील प्रकरणी सहारा इंडियाचे झोनल प्रमुख ए. के. त्रिपाठी यांनी १७ फेब्रुवारी २०१८ साली तक्रार केली होती. त्यानंतर तपास यंत्रणा संशयिताच्या शोधात होती. 

दरम्यान, याप्रकरणी आणखी काहीजणांच्या शोधात पोलीस आहेत. त्यात के. व्हाय. शरीफ,  झाकी खान यांचा समावेश आहे.