ओंकारचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा

आमदार आर्लेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
06th April, 05:35 pm
ओंकारचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा

पणजी : सिंधुदुर्ग (Sindhudurg)  जिल्ह्यातून मोपा (Mopa), तांबोशे परिसरात येण्याची ओंकार हत्तीची (Onkar Elephant)  ही तिसरी वेळ आहे. याच्यापूर्वी गोव्याबाहेर पळवून लावल्यानंतर आता तो परत येऊन शेतीचे नुकसान करायला लागला आहे. शेती, बागायतीचे रक्षण करण्यासहीत पुढील अनर्थ होऊ नये म्हणून हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केली आहे.

मुख्यमंत्री (Chief Minister)  डॉ. प्रमोद सावंत आणि वन खात्याचे मंत्री विश्वजी‌त राणे यांच्याकडे फोनवरून चर्चा केली असल्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले. ओंकार हत्ती मोपा, तांबोशे परिसरात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सुद्धा या परिसरात येऊन शेती, बागायतीचे नुकसान केले आहे.

माणसांवर पण त्याने हल्ला केला आहे. यासाठी या विषयावर गंभीरपणे विचार करायला हवा. पूर्वी सारखे त्याला पळवून लावल्यास काही दिवसांनी तो पुन्हा गोव्याच्या (Goa)  हद्दीत येणार. फुटबॉलचा (Football) खेळ बंद होण्यासाठी त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करायला हवा. त्याला पकडून सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची गरज आहे, असे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले.