
पणजी : एका नामांकित खासगी रुग्णालयात (well-known hospital) रुजू झालेल्या तरुण महिला डॉक्टरने काही तासांतच नोकरीचा राजीनामा दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेपेक्षा आर्थिक फायद्याला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करीत तिने हा निर्णय घेतला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डॉक्टरने (doctor ) गंभीर आरोप करीत सांगितले की, रुग्णालयाच्या मालकांनी जवळपास प्रत्येक रुग्णाला अॅडमिट करण्याचे निर्देश दिले होते. अगदी ज्यांना प्रत्यक्षात दाखल होण्याची गरज नव्हती त्यांनाही. याशिवाय, रुग्णांना अनावश्यकपणे आयसीयूमध्ये (ICU) जास्त काळ ठेवून बिल वाढवले जात असल्याचाही आरोप तिने केला.
डॉक्टरच्या म्हणण्यानुसार, “मी एका प्रतिष्ठित रुग्णालयात जॉईन झाले होते. चांगला पगारही मिळत होता. पण पहिल्याच दिवशी लक्षात आले की; मला फक्त नावापुरते ठेवले आहे. सर्व निर्णय रुग्णालयाच्या मालकांकडून घेतले जात होते.” विशेष म्हणजे संबंधित मालक स्त्रीरोगतज्ज्ञ असूनही सर्व रुग्णांच्या (patient) उपचारांबाबत निर्णय घेत असल्याचे तिने नमूद केले.
“प्रत्येक रुग्णाला अॅडमिट करायचे आणि अॅडमिट झालेल्या प्रत्येक रुग्णाला आयसीयूमध्ये ठेवायचे, असे धोरण होते. हे सर्व पाहून मी हादरले. पैशासाठी रुग्णांचे नुकसान करणाऱ्या व्यवस्थेचा भाग होणे मला मान्य नव्हते,” असेही तिने स्पष्ट केले.
नैतिक मूल्यांशी तडजोड न करण्याचा निर्णय घेत डॉक्टरने त्याच दिवशी राजीनामा दिला. “चुकीचे कृत्य त्यांच्या नावाने होत असले तरी जबाबदारी माझ्यावर आली असती. त्यामुळे अशा अनैतिक गोष्टींसाठी मला वापरले जाऊ नये म्हणून मी नोकरी सोडली,” असे ती म्हणाली.
सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया
दरम्यान, या घटनेवर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी हे अनेक खासगी रुग्णालयांमध्ये घडणारे वास्तव असल्याचे सांगितले, तर काहींनी एका अप्रमाणित प्रकरणावरून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर आरोप करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले.
काही नेटिझन्सनी अनावश्यक अॅडमिशन, वाढीव बिलिंग आणि आयसीयूचा गैरवापर ही काही ठिकाणी ‘व्यवसायाची पद्धत’ बनल्याचा आरोप केला. तर काहींनी “पैशापेक्षा नैतिकतेला प्राधान्य देणाऱ्या डॉक्टरचे कौतुक कराय