कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरण : सोहम नाईकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
09th April, 04:20 pm
कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरण : सोहम नाईकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पणजी : कुडचडे लैंगिक अत्याचार (Curchorem Sex Assault)  प्रकरणातील संशयित सोहम नाईक (Soham Naik)  याला बाल न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. 

कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणात कुडचडे पोलिसांनी (Curchorem Police)  सोहम नाईक याला अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी केलेल्यांमध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. 

मुलींशी मैत्री करून व लग्न करण्याचे आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार केल्याचे व त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून इतरांना पाठवल्याचा आरोप संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध आहे. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने काहीजणांच्या जबान्याही नोंदवून घेतल्या आहेत. 

हेही वाचा