महाकुंभातील ‘व्हायरल गर्ल’ मोनालिसाचे लग्न अडचणीत; पती फरमानविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा

अल्पवयीन असल्याचे उघड

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10th April, 05:18 pm
महाकुंभातील ‘व्हायरल गर्ल’  मोनालिसाचे लग्न अडचणीत; पती फरमानविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा

भोपाळ : प्रयागराज येथील महाकुंभ (Maha Kumbh)  मेळ्यात मण्यांची विक्री करताना व्हायरल झालेली मोनालिसा भोसले (Monalisa Bhosle) हिच्या लग्नावर आता गंभीर कायदेशीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सुरूवातीला एक भावनिक आणि चर्चेतील प्रेमकथा म्हणून समोर आलेली ही घटना आता कायदेशीर वादात अडकली आहे.

तपासादरम्यान मोनालिसा ही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले असून, तिचा पती फरमान खान (Farman Khan) याच्याविरुद्ध मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथे बाल लैंगिक अत्याचार प्रत‌िबंधक कायद्याअंतर्गत (पॉक्सो POCSO)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोनालिसाचा जन्म ३० डिसेंबर २००९ रोजी झाला असून, ११ मार्च २०२६ रोजी विवाह झाला तेव्हा ती केवळ १६ वर्षांची होती. त्यामुळे हा विवाह कायद्याच्या चौकटीत वैध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच, हा विवाह केरळमधील एका मंदिरात बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मोनालिसा ही पारधी आदिवासी समाजातील असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर गाजलेल्या या ‘व्हायरल’ कथेला आता वेगळेच वळण मिळाले आहे.  

हेही वाचा