महिला आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांनी साधला काँग्रेसवर निशाणा

पणजीत महिला भाजपचा निषेध मोर्चा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
महिला आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांनी साधला काँग्रेसवर निशाणा

पणजी : महिला आरक्षण विधेयकाला लोकसभेत (Womens reservation bill)  विरोध करणाऱ्या काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये जनतेने योग्य तो धडा शिकवावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी केले. काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या भूमीकेमुळेच हे महत्त्वाचे विधेयक संमत होऊ शकले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधकांच्या भूमीकेविरोधात महिला भाजपतर्फे (BJP) पणजी येथे जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या आंदोलनात आमदार डॉ. देविया राणे ( Deviya Rane)  आणि डिलायला लोबो (Delilah Lobo), भाजप महिला मोर्चाच्या गोवा अध्यक्ष सुवर्णा प्रभू तेंडुलकर (Suvarna Prabhu Tendulkar)  यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. महिलांच्या हक्कांसाठी आणि राजकीय सक्षमीकरणासाठी महिला आरक्षण अत्यावश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

मोर्चा दरम्यान घोषणाबाजी करत महिला कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने आणलेल्या विधेयकाला पाठिंबा दर्शवला.  विरोधकांच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला. आगामी काळात महिला आरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्रतेने मांडला जाईल, असा इशाराही देण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईकही यावेळी उपस्थित होते. 

हेही वाचा