रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरने उत्सुकता शिगेला

१ मे रोजी होणार चित्रपट हिंदी आणि मराठीतून प्रदर्श‌ित

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
38 mins ago
रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरने उत्सुकता शिगेला

मुंबई : ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक’ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम, जीवन आणि  महान वारशावर आधार‌ित रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या चित्रपटाचा ट्रेलर सध्या गाजत आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दल उत्सूकता शिगेला पोहोचली आहे १ मे रोजी हिंदी आणि मराठीतून प्रदर्श‌ित होणार आहे. 

या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती रितेश विलासराव देशमुख (Riteish Deshmukh)  यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj)  भूमीकाही तेच साकारत आहेत. त्यात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा एक जबरदस्त मेळ साधण्यात आला आहे.

यामध्ये संजय दत्त (Sanjay Dutt) , अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), विद्या बालन (Vidya Balan), महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar), सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांचा समावेश आहे. अत्यंत उत्कंटतेने भारलेला व राष्ट्रभक्तीच्या ऊर्जेने भारलेला असा हा चित्रपट असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. 

चित्रपट सृष्टीतही या ‘राजा शिवाजी’ बद्दल बरीच उत्सूकता आहे. अनेक नामांकित कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी चित्रपटाचा ट्रेलर पाहून भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत रितेश देशमुख व सहकारी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.  

दिग्दर्शक सुभाष घई यांनी म्हटले आहे की, ‘‘कल्पना करा, जर ट्रेलर इतका जबरदस्त असेल, तर चित्रपट कसा असेल! चित्रपटगृहांमध्ये एक केवळ जादुई अनुभव... हेच आहे. ‘राजा शिवाजी’. लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी बनवलेला आणि ज्योती देशपांडे यांनी ‘जिओ’साठी निर्मित केलेला हा चित्रपट अत्यंत उत्कंटनेते आणि पूर्णपण राष्ट्रभक्तीच्या ऊर्जेने भारलेला आहे.

मला ते स्पष्टपणे दिसून येत आहे. हा चित्रपट उत्कृष्ट ठरावा यासाठी संजय दत्त, अभिषेक बच्चन आणि संपूर्ण ‌चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी मनापासून पाठिंबा दिला आहे. हा चित्रपट लवकरच पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत’’. असे सुभाष घई यांनी म्हटले आहे. 

दिग्दर्शक करण जोहर, आदित्य सरपोतदार, कुकी गुलाटी व मिलाप झवेरी, अभिनेता सोनू सूद, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता सिद्धार्थ जाधव, गायक अभिजित सावंत, दिग्दर्शक केदार शिंदे, अभ‌िनेत्री प्रिया बापट यांच्यासहीत अनेकांनी या चित्रपटाबद्दल भरभरून लिहिले आहे व रितेश देशमुख यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. बॉक्स ऑफीसवरही चित्रपट ‘ब्लॉक बस्टर’ ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.   



हेही वाचा