दुर्दैवी घटना, भाटपाल-काणकोण येथे दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू!

परिसरात शोककळा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
दुर्दैवी घटना, भाटपाल-काणकोण येथे दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू!

काणकोण/पैंगीण : वज्रे-भाटपाल, काणकोण (Bhatpal, Canacona) येथे तीन लहान मुले नदीवर गेली होती.  त्यातील दोन मुले बुडाली. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. बुडालेल्या दोन मुलांपैकी एक मुलगा कारवार येथील आहे. तो आपल्या मावशीकडे रहायला आला होता. 

बुडालेल्या मुलांची नावे ध्रुव वड्डार (७ वर्षे, नवे वाडे  व ऋतविक नाईक (११ वर्षे,  कारवार)  अशी आहेत. घरातील मंडळींची नजर चुकवून तीन मुले जवळ असलेल्या नदीवर गेली. त्यातील दोघे बुडाले. एकाला स्थानिक ग्रामस्थांनी वाचवले. या घटनेची माहिती काणकोण अग्न‌िशमन दलाला (Canacona Fire station) देण्यात आली.

त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.  मृतदेह काणकोणच्या सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. शवविच्छेदनासाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पीतळात पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान, दोन चिमुकल्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत असून, परिसरात शोककळा पसरली आहे. 

हेही वाचा