होर्मुझ सामुद्रधुनी सुरू करा; युद्ध संपवा : इराणचा अमेरिकेला नवा प्रस्ताव

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
होर्मुझ सामुद्रधुनी सुरू करा; युद्ध संपवा : इराणचा अमेरिकेला नवा प्रस्ताव

तेहरान/सेंट पीटर्सबर्ग : पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याचा आणि युद्ध संपवण्याचा मार्ग सुचवला असल्याची माहिती समोर आली आहे. दीर्घकाळ चाललेल्या शांतता चर्चांमध्ये यामुळे नवी आशा निर्माण झाली आहे.

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची सध्या सक्रिय राजनैतिक हालचाली करत असून; त्यांनी पाकिस्तान आणि ओमानदरम्यान ‘शटल डिप्लोमसी’ सुरू ठेवली आहे. दरम्यान, ते सोमवारी सेंट पीटर्सबर्ग येथे पोहोचले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा होत आहे.

काय घडले गेल्या काही तासांत?

इराणी सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार,  अराघची सोमवारी पहाटे सेंट पीटर्सबर्गमध्ये दाखल झाले.

रशियन वृत्तसंस्थेने पुतिन-अराघची भेटीची केली पुष्टी 

अमेरिकेतील माध्यमाच्या अहवालानुसार, इराणच्या नव्या प्रस्तावात होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz)  पुन्हा खुली करून संघर्ष समाप्त करण्याचा आराखडा मांडण्यात आला आहे.

रशियातील इराणचे राजदूत काझेम जलाली यांनी सांगितले की, ही भेट देशाच्या हितासाठी सुरू असलेल्या “राजनैतिक संघर्षाचा” भाग आहे.

जलाली यांनी इराण (Iran) आणि रशिया (Russia) एकत्र येऊन “एकतर्फी वर्चस्वाला विरोध” करत असल्याचेही स्पष्ट केले.

तेलाच्या किमती वाढल्या

दरम्यान, अमेरिका-इराण (U.S. Iran) चर्चेत अजूनही अनिश्चितता कायम असल्याने आणि होर्मुझ र्मुझ मार्गे तेलवाहतूक मर्यादित असल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

ब्रेंट क्रूड सुमारे १.३ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल १०६.६८ वर पोहोचली आहे. 

यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटची (WTI) किंमतही १ टक्क्यांनी वाढून ९५.३५ डॉलरवर गेली आहे. 

अमेरिकेच्या भूमीकेकडे लक्ष

इराणचा हा नवा प्रस्ताव संघर्ष संपवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, मात्र अमेरिका यावर कशी प्रतिक्रिया देते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत या चर्चांना निर्णायक वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




हेही वाचा