गाड्यांच्या 'शॉर्ट टर्मिनेशन'ला १९ मेपर्यंत मुदतवाढ; रेल्वे वेळापत्रकावर परिणाम

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
गाड्यांच्या 'शॉर्ट टर्मिनेशन'ला १९ मेपर्यंत मुदतवाढ; रेल्वे वेळापत्रकावर परिणाम

मडगाव : रेल्वे प्रशासनाकडून दादर आणि ठाणे स्थानकांवर गाड्यांच्या 'शॉर्ट टर्मिनेशन'ला (नियोजित स्थानकापूर्वीच गाडी थांबवणे) आणखी २३ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या १९ मेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसऐवजी (CSMT) दादर आणि ठाणे स्थानकांपर्यंतच धावतील.

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक १६ आणि १७ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईला जाणाऱ्या काही गाड्या नियोजित स्थानकाआधीच थांबवण्यात येत होत्या. या बदलाला आता १९ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या बदलांनुसार:

 * गाडी क्रमांक २२१२० (मडगाव - मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस): ही गाडी सीएसएमटीऐवजी दादर स्थानकावर आपला प्रवास थांबवेल.

 * गाडी क्रमांक १२१३४ (मंगळुरू जंक्शन - मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस): ही गाडी सीएसएमटीऐवजी ठाणे स्थानकावर थांबेल.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.

विशेष गाडीच्या वेळेत बदल

मध्य रेल्वेने मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या गाडी क्रमांक ०११७१ या साप्ताहिक विशेष गाडीच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही गाडी मुंबई सीएसएमटी स्थानकावरून रात्री १२:२० ऐवजी १२:३० वाजता सुटेल. ही गाडी दादर स्थानकावर रात्री १२:४२ वाजता पोहोचेल आणि १२:४५ वाजता मडगावसाठी रवाना होईल.

हेही वाचा