पणजी कदंब बसस्थानकावर पर्यटकांची सतावणूक; १० दलालांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
पणजी कदंब बसस्थानकावर पर्यटकांची सतावणूक; १० दलालांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पणजी : पर्यटकांना त्रास देत असल्याच्या तक्रारींवरून पणजी पोलिसांनी (Panjim Police) कदंब बसस्थानक (KTC) परिसरात कारवाई करत १० दलालांना ताब्यात घेतले.  मंगळवारी यासंदर्भात पर्यटकांकडून तक्रारी नोंद झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दलाल पर्यटकांना (Tourist) जबरदस्तीने हॉटेल, टॅक्सी किंवा अन्य सेवांसाठी त्यांच्यामागे लागून सतावणूक करत होते.  त्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. या प्रकारामुळे गोव्याच्या पर्यटन प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची बाब समोर आली होती.

गोवा पोलिसांनी (Goa Police)  अचानक धाड टाकून या दलालांना ताब्यात घेतले.  पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. यापुढेही अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमितपणे अशा मोहिमा राबवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

हेही वाचा