
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची नवी दिल्लीत भाजप (New Delhi BJP office) मुख्यालयात भेट घेत सविस्तर चर्चा केली. यावेळी भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या बैठकीत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, सुरू असलेल्या विविध उपक्रमांची प्रगती तसेच आगामी कार्यक्रमांबाबत चर्चा केल्याची माहिती दिली. कार्यकर्त्यांना अधिक सक्षम बनविणे आणि जनसंपर्क वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.
ही बैठक पक्ष संघटन अधिक मजबूत करणारी ठरणार असून, आगामी काळात भाजपच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण दिशा ठरविण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.