गोव्यातील नगरपालिका निवडणूक अध्यादेशाला उच्च न्यायालयात आव्हान

निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार; १० जून रोजी पुढील सुनावणी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
गोव्यातील नगरपालिका निवडणूक अध्यादेशाला उच्च न्यायालयात आव्हान

पणजी : गोव्यातील नगरपालिका निवडणुकीसंदर्भात (Muncipality Election Goa)  गोवा सरकारने (Goa Government)  जारी केलेल्या अध्यादेशाला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात (High Court)  आव्हान देण्यात आले आहे. या अध्यादेशाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली असून, पुढील सुनावणी १० जून रोजी होणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाला न्यायालयाने प्रत‌िज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. 

यासंदर्भात माहिती देताना याचिकादार ट्रोजन डिमेलो यांनी सांगितले की, गोवा सरकारने नगरपालिका निवडणूक मुदतीत घेणे गरजेचे होते. अध्यादेश काढून निवडणूक पुढे ढकळणे चुकीचे असून, ठरलेल्या वेळेत ही प्रक्रिया होणे गरजेचे होते. गोवा सरकारच्या अध्यादेशाला आपण गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली आहे. अंतिम सुनावणी १० जून रोजी होणार आहे.

दरम्यान, शितेश मोरे यांनीही नगरपालिका निवडणुकीसंदर्भातील अध्यादेशाला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 

हेही वाचा