
वास्को: वास्को येथील शिखा पाठक यांची प्रतिष्ठित जु-जितसु आंतरराष्ट्रीय (Ju-Jitsu International Federation (JJIF)) विश्वकप स्पर्धेसाठी पंच (रेफरी) म्हणून निवड झाली आहे. जु-जितसु जेजेआयएफ २०२६ विश्वकप चाम्पियन (“Ju-Jitsu JJIF 2026 World Cup Championship”) स्पर्धा केमेर, अंटालया, तुर्कस्तान (Turkey) येथे १२ ते १७ मे या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
शिखा पाठक या जगातील अव्वल दहा पंचांपैकी एक म्हणून या स्पर्धेसाठी निवडल्या गेल्या असून, हा सन्मान गोवा तसेच भारतासाठी अभिमानास्पद मानला जात आहे. या जागतिक स्पर्धेत विविध देशांतील उत्कृष्ट खेळाडू आणि अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे.
वास्को येथील शिखा पाठक यांच्या या उल्लेखनीय यशामुळे गोव्याच्या क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.