पुदुचेरीत रंगासामी घेणार १३ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
पुदुचेरीत रंगासामी घेणार १३ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ

पुदुचेरी :  एनडीएला पुदुचेरीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर एन. रंगासामी यांनी पुन्हा सरकार स्थापनेचा दावा केला आहे.  १३ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली.

शुक्रवारी रंगासामी यांनी ले. राज्यपाल के. कैलासनाथन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी आवश्यक पाठिंब्याची पत्रे सादर केली. यासह पुदुचेरीत (Puducherry)  पाचव्यांदा सरकार स्थापनेचा दावा करणारे ते पहिले नेते ठरले आहेत.

३० सदस्यीय विधानसभा निवडणुकीत एनडीएने (NDA)  १८ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. ऑल इंडिया एनआर काँग्रेसला (AINRC) १२ जागा, भाजपला ४ जागा मिळाल्या, तर एआयएडीएमके आणि लक्ष्या जननागा काची (LJK) यांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला.

सरकार स्थापनेचा प्रस्ताव आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात येणार असून, राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर नियुक्तीचा अधिकृत आदेश जारी केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा