
पणजी : काणकोण तालुक्यातील (Canacona Taluka) गुळे येथे मंगळुरू (Mangaluru) नोंदणी असलेली एक जीप रस्त्यावरील नियंत्रण सुटल्याने थेट शेतातील झाडावर जाऊन आदळली. उलटली. या अपघातात दोघे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जीप भरधाव वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्ता सोडून शेतात गेली. जीप शेतातील झाडावर आदळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविले. संबंधित घटनेची नोंद काणकोण पोलिसांनी (Canacona Police) घेतली असून; पुढील तपास सुरू आहे.