
पणजी : गोव्यातील प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट तथा रद्द झालेल्या फोंडा विधानसभा मतदारसंघातील (Ponda assembly constituency) पोटनिवडणुकीतील कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांना उजव्या हाताला सर्पदंश झाला. पोस्टमार्टेम अहवालानुसार विष शरीरात झपाट्याने पसरल्यामुळे मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भाटीकर हे दांडेलीहून गोव्याकडे परतत असताना अनमोड घाट परिसरात काही वेळ थांबले होते. याच दरम्यान त्यांना विषारी सापाने दंश केला. सर्पदंशानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि विषाचा परिणाम वेगाने वाढल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह गोव्यात हळहळ व्यक्त केली जात असून, डॉ. भाटीकर यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
आज अंत्यसंस्कार
दरम्यान, सिल्वानगर, फोंडा येथील त्यांच्या निवासस्थानी डॉ. केतन भाटीकर (Dr. Ketan Bhatikar) यांचे पार्थिव आणण्यात आले. आज संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.