सांतीनेज, पणजी येथे साखळी अपघात; तीन वाहने एकमेकांवर आदळली

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
सांतीनेज, पणजी येथे साखळी अपघात; तीन वाहने एकमेकांवर आदळली

पणजी : पणजीतील (Panjim) सांतीनेज परिसरातील चाररस्त्यावर झालेल्या साखळी अपघातात (Accident at St.Inez, Goa)  तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने मोठी खळबळ उडाली. भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने कर्नाटक नोंदणी (Karnataka-registered Mini pickup) असलेल्या मिनी पिकअप मालवाहू वाहनाच्या पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेचा प्रभाव इतका तीव्र होता की, मिनी पिकअप पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर आदळली. त्यामुळे एकूण तीन वाहने या अपघातात सापडली. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पोलिसांनी (Goa Police) घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून; अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा