आठवड्यात दुसऱ्यांदा इंधन दरवाढ; गोव्यात पेट्रोल शंभरीपार

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
आठवड्यात दुसऱ्यांदा इंधन दरवाढ; गोव्यात पेट्रोल शंभरीपार

पणजी : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Prices)  दरात पुन्हा वाढ करण्यात आली असून; आठवड्यातील ही दुसरी दरवाढ ठरली आहे. या दरवाढीचा परिणाम गोव्यातही दिसून आला आहे. पेट्रोलच्या दरात तब्बल ९० पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोलचा दर पुन्हा शंभरीपार गेला आहे.

नव्या दरानुसार गोव्यात पेट्रोल (Petrol-Diesel Prices in Goa) १००.४० रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर ९२.१७ रुपये प्रतिलिटर झाला आहे. तसेच प्रीमियम श्रेणीतील स्पीड पेट्रोलसाठी वाहनधारकांना आता १०९.२९ रुपये प्रतिलिटर मोजावे लागत आहेत.

आठवड्यात सलग दुसऱ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक तसेच मालवाहतूक क्षेत्रावर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक खर्चावर होऊन दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे.

तुलनेत गोव्यात दर कमी 

पेट्रोल दरवाढ झाली असली तरी इतर शहरांच्या तुलनेत गोव्यात पेट्रोलचे दर कमी आहेत. दरवाढीनंतर पुण्यात पेट्रोल १०६.९८ रुपये,  मुंबईत १०७.६० रुपये,  बंगळुरूमध्ये १०७.१० रुपये, हैद्राबादमध्ये ११०.८९ रुपये आहे. इतर शहरांच्या तुलनेत डिझेलही गोव्यात किंचित स्वस्त आहे.

दरवाढी नंतर गोव्यात डिझेलची किंमत ९२.१७ रुपये झाली आहे. मुंबईत डिझेल ९४.०८,  पुण्यात ९४.३९, बंगळूरूत ९५.०४ रुपये आहे.

हेही वाचा