अष्टगंधातील ११ कोटींची अफरातफर; कांदोळकर, इतरांच्या हस्ताक्षर चाचणीस न्यायालयाची परवानगी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
22nd May, 05:15 pm
अष्टगंधातील ११ कोटींची अफरातफर; कांदोळकर, इतरांच्या हस्ताक्षर चाचणीस न्यायालयाची परवानगी

पणजी : पेडणे तालुक्यातील (Pernem Taluka)  अस्थगंधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ११ कोटींच्या अफरातफर प्रकरणात उत्तर गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने (Principal District and Session Court  North Goa)  याप्रकरणातील संशयित प्रकाश कांदोळकर व इतरांच्या नमुना स्वाक्षऱ्या व हस्ताक्षर नमुने घेण्यास आर्थ‌िक गुन्हा शाखेला (EOC)  परवानगी दिली आहे. 

आर्थ‌िक गुन्हा शाखेने यासंदर्भात केलेल्या अर्जावर सुनावणी घेताना न्यायालयाने न्यायाच्या दृष्टीने ते आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवले. प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आणि संबंधित दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी हस्ताक्षर व स्वाक्षरी नमुने महत्त्वाचे ठरणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. 

अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील आर्थ‌िक अफरातफर प्रकरणात प्रकाश कांदोळकर याला आर्थ‌िक गुन्हा विभागाने अटक केली आहे. आता गुन्हा शाखेकडून विविध आर्थ‌िक व्यवहार आणि कागदपत्रांची चौकशी सुरू आहे. 

हेही वाचा