गोवा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकांच्या ५५ जागांसाठी भरती

२१ वेगवेगळ्या विषयांतील रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून विद्यापीठाने अर्ज मागवले आहेत. असा करावा अर्ज.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
6 hours ago
गोवा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकांच्या ५५ जागांसाठी भरती

पणजी : गोवा विद्यापीठाने २१ विविध अभ्यासक्रमांसाठी (अध्ययनशाखा) सहाय्यक प्राध्यापकांच्या एकूण ५५ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ही सर्व पदे पूर्णपणे कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल, अशी अधिकृत अधिसूचना गोवा विद्यापीठाने प्रसिद्ध केली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी किंवा संबंधित जागांवर नियमित प्राध्यापकांची नियुक्ती होईपर्यंत ही ५५ पदे भरली जातील. शैक्षणिक वर्षातील निकड आणि गरजेनुसार वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या सत्रासाठी हा कंत्राट कालावधी वाढवून देण्याचा अधिकार विद्यापीठाने राखीव ठेवला आहे.


अ.क्र.विषय / अभ्यासक्रम (Subject / Discipline)एकूण पदेप्रवर्गनिहाय आरक्षण तपशील (Category-wise Reservation)
सागरी विज्ञान (Marine Science)१-अनारक्षित
रिमोट सेन्सिंग अँड जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम१-अनारक्षित, १-ओबीसी
भौतिकशास्त्र (Physics)१-अनारक्षित
कॉम्प्युटेशनल फिजिक्स१-ओबीसी
पर्यावरण विज्ञान१-अनारक्षित
कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी११४-अनारक्षित, २-ईडब्ल्यूएस, २-ओबीसी, १-एससी, १-एसटी, १-पीडब्ल्यूडी
इलेक्ट्रॉनिक्स (बी. व्हॉक)१-अनारक्षित, १-एसटी
ईंन-ऑर्गेनिक रसायनशास्त्र (Inorganic Chemistry)१-अनारक्षित
प्राणीशास्त्र (Zoology)१-ईडब्ल्यूएस, १-एसटी
१०बायोटेक्नॉलॉजी१-अनारक्षित
११कायदा (Law)१-अनारक्षित, १-ओबीसी, १-एसटी
१२लोकप्रशासन (Public Administration)१-अनारक्षित, १-ओबीसी, १-ईडब्ल्यूएस
१३इंग्रजी१-अनारक्षित
१४फ्रेंच१-अनारक्षित, १-ओबीसी
१५पोर्तुगीज१-अनारक्षित, १-एसटी
१६इंटिग्रेटेड (एमबीए) हॉस्पिटॅलिटी अँड टूरिझम१-अनारक्षित
१७अर्थशास्त्र१-ओबीसी
१८इतिहास१-अनारक्षित, १-ओबीसी
१९समाजशास्त्र१-अनारक्षित, १-ओबीसी
२०समाजकार्य (Social Work)१-अनारक्षित, २-ओबीसी, १-पीडब्ल्यूडी
२१राज्यशास्त्र१-अनारक्षित, १-एसटी
एकूण पदे५५
अर्जाच्या प्रक्रियेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा : 

file:///D:/Documents/Downloads/details_720260602.164514.pdf

या सर्व पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, मुलाखतीचे वेळापत्रक आणि तारीख यासंबंधीची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी गोवा विद्यापीठाच्या कुलसचिवांना (रजिस्ट्रार) संबोधित केलेल्या अर्जासह, आपल्या मूळ कागदपत्रांनिशी ठरलेल्या वेळेत थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.