माझे घर योजनेंतर्गत उद्या मडगावात १ हजार सनदांचे वितरण

सरकारी जमिनीवरील ९० टक्के घरे ही गोमंतकीयांची : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
माझे घर योजनेंतर्गत उद्या मडगावात १ हजार सनदांचे वितरण

पणजी : सरकारी, कोमु‌निदाद, खासगी जमिनीवरील घरे नावावर करून देणाऱ्या ‘माझे घर’ योजनेखाली ३ हजार सनदांची  प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दक्षिण गोव्यासाठी उद्या मडगावात होणार कार्यक्रमात १ हजारांवर सनदा देण्यात येणार. उत्तर गोव्यातही सनदा देण्याचा कार्यक्रम होणार.  लवकरच या योजनेखाली लवकरच ५ हजार सनदा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

उद्या सकाळी ११ वाजता मडगाव रवींद्रभवनात सनद वितरणाचा कार्यक्रम होणार. मंत्र‌िमंडळ बैठकीनंतर  बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सरकारी जमिनीत असलेली ९० टक्के घरे गोमंतकीयांची आहेत. सांगे, धांरबांदोडा तसेच इतर तालुक्यांनी सरकारी जमिनीवर गोमंतकीयांची घरे आहेत. ही घरे नावावर  करण्यासाठी पैसे भरावे लागतात. सर्व्हेवर असलेली १९७२ पूर्वीची घरे, खासगी जमिनीतील घरे, कोमुनिदाद जमिनीतील घरे, नावावर करण्यासाठी ही योजना आहे.

कोमुनिदाद समितीने मान्यता दिल्यावरच लोकांनी कोमुनिदादीच्या जमिनीवर घरे बांधली आहेत. अल्वारा जमिनीवरील घरे सुद्धा योग्य कागदपत्रे असल्यास नावावर होणार. काहीजणांनी कागदपत्रे व्यवस्थित सादर न केल्याने त्यांचे अर्ज प्रलंब‌ित आहेत. त्यांनी व्यवस्थित कागदपत्रे सादर करावीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

नोकरभरती कर्मचारी आयोगामार्फतच

सरकारी नोकर भरती पारदर्शकपणे आणि गुणवत्तेवर आधारीत होण्यासाठी ती कर्मचारी भरती आयोगामार्फतच होणार, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या आमदार, मंत्र्यांच्या बैठकीत काही आमदारांनी कर्मचारी भरती आयोगाला विरोध केला होता. 

मंत्रीमंडळाचे निर्णय

वसतीगृहासाठी केपे सरकारी महाविद्यालयाला २०२४५ चौ.मी. जम‌िनीचे हस्तांतरण. 

पाणथळ (वॅटलॅंड) प्राध‌िकरणाला ४० लाख. 

मळकर्णे येथे अग्न‌िशमन दलासाठी ५१५० चौ.मी. जमीन. 

एसटीसाठी मतदारसंघ आरक्षणाचा निर्णय निवडणूक आयोग घेणार 

येत्या विधानसभा निवडणुकीत एसटी आरक्षण लागू व्हावे म्हणून सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कुठले मतदारसंघ आरक्षीत होणार याचा निर्णय मी घेणार नाही तर निवडणूक आयोग घेणार, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सभापती गणेश गावकर, आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर, आमदार गोविंद गावडे, आमदार अॅंथनी वाझ यांनी भेट घेऊन एसटी आरक्षणासंदर्भात निवेदन सादर केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. 

हेही वाचा