
पणजी : एनडीएची (NDA) बैठक तसेच निती आयोगाच्या बैठकीसाठी मंगळवारी रात्री दिल्लीत (Delhi) गेलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज बुधवारी त्यांनी केंद्रीय ऊर्जा आणि गृहनिर्माण मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊन विविध योजनांवर चर्चा केली.
गोव्यातील गृहनिर्माण प्रकल्प, शहर विकास योजना यावर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी दिली. राज्यातील प्रलंबित प्रकल्पांसाठी निधी तसेच इतर मदत करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. गेल्या १० दिवसांत मुख्यमंत्री चौथ्यांदा दिल्लीत गेले आहेत.
यापूर्वी झालेल्या भेटीत त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, कामगारमंत्री मनसूख मांडविया, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, नदी परिवहनमंत्री सर्बानंद सोनोवाल, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.